Saturday, January 14, 2023

 आजरा महाविद्यालयच्या खेळाडूची स्पर्धा मध्ये पदकाची लयलूट  

 आजरा महाविद्यालय ची आंतरराष्ट्रीय तलवारबाज  खेळाडू ज्योती अरुण सुतार हिला जम्मू विदयापीठ, जम्मू येथे नुकत्याच पार पडलेल्या  अखिल भारतीय फेनसिंग( तलवारबाजी) स्पर्धा मध्ये फॉइल क्रीडा प्रकार मध्ये महाराष्ट्र महिला संघातून खेळत कास्य पदक प्राप्त केले.

तसेच औरंगाबाद येथे पार पडलेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धा मध्ये महिला फेन्सिंग फॉईल प्रकार मध्ये व्यक्तीगत स्पर्धा मध्ये कास्य पदक व सांघिक फॉईल प्रकारामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले.खेलो इंडिया  स्पर्धा साठी निवड झाली आहे 

सिद्धांत पुजारी मंगलोर येथे पार पडलेल्या वेस्ट झोन नॅशनल 3000 मिटर स्टीपल चेस  प्रकारात कास्य पदक प्राप्त केले त्याची निवड अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड  झाली आहे. पुणे येथे पार पडलेल्या मिनी ऑलिम्पिक स्पर्धा मध्ये रोप्य पदक प्राप्त केले.


निकिता पिष्टे हिने चंद्रपूर येथे पडलेल्या राज्य कयकिंग (नोकनायन ), कास्य पदक प्राप्त केले व मिनी ऑलिम्पिक कयाकिंग स्पर्धा मध्ये k1मध्ये रोप्य पदक k4 स्पर्धा मध्ये रौप्य पदक प्राप्त केले.

  

   संस्थेचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी,मा. डॉ. अनिल देशपांडे, मा. रमेश कुरुनकर, डॉ. दिपक सातोस्क्रर,  योगेश पाटील, दिनेश कुरुनकर, प्राचार्य डॉ. अशोक सादले, उपप्राचार्य दिलीप संकपाळ डॉ. धनंजय पाटील  , अल्बर्ट फर्नांडिस, प्राध्यापकवृंद, शिक्षककेतर कर्मचारी  यांचे प्रोत्साहन लाभले .

No comments:

Post a Comment

PHYSICAL EDUCATION AND SPORTS ACTIVITY  2022-23